Translate

Showing posts with label हिंदु. Show all posts
Showing posts with label हिंदु. Show all posts

7 Years of Modi's Government.

 ミ★ मोदींचा भारत ★彡

ミ★(26 मे 2014 ते 26 मे 2021)★彡




आज भारत देश हा मुख्यत्वे दोन कालखंडात विभागला जातो. एक म्हणजे मोदी 2014 ला येण्यापूर्वीचा आणि दुसरा म्हणजे मोदी 2014 ला आल्यानंतरचा ते आजपर्यंत. 


मोदी येऊन आज सात वर्ष पूर्ण होत आहेत.


आपण मोदींना दोनदा निवडून यासाठी दिले होते. कारण, आपल्याला बदल हवा होता. 


मग खरोखर काही बदल झालेत का? हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात आहे. 


या सात वर्षात भारतामध्ये काही ठळक बदल घडून आले जे मी आपल्यासमोर इथे मांडणार आहे. 


सर्वात महत्वाचा आणि पहिला बदल म्हणजे,आजच्या भारतात, जे लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत ते क्वचितच कोणाचे तरी वारसदार आहेत. परंतु, 2014 पर्यंत जी परंपरा चालत आली, त्यात स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, बडे सरकारी अधिकारी, फिक्सर्स- ज्यांच्याजवळ मोठ्या घराण्यातील लोकांची ओळखी आणि कनेक्शन होते, असेच लोक हे प्रशासनात होते.


परंतु, 2014 नंतर त्यांच्याजागी नवीन लोक आले - जे चमक धमक न ठेवता कामावर लक्ष देतात आणि ज्यांची देशाची समज चांगली आहे, त्यांना अधिक चांगल्याप्रकारे लोकांमध्ये मिळून मिसळून काम करता येते, ते पक्षपात करीत नाहीत आणि पक्के राष्ट्रवादी आहेत.मुख्य म्हणजे ते हिंदू असल्याबद्दल त्यांना चीड़ येत नाही आणि सोबतच ते तंत्रज्ञान आणि विज्ञानाची  सांगड सहजपणे घालतात.


हा एक नवीन भारत आहे, ज्याची "मोदींचा भारत" अशी व्याख्या केली जाते आणि त्याला सामाजिक आधार बनवून कार्यक्षम वितरण, उद्योजकता आणि स्पर्धात्मक बाजारपेठेवर भर देतो. दुसरा मोठा बदल म्हणजे, 2014 पूर्वी असलेली भ्रष्टाचाराची लाट आता ओसरत आहे.


जेव्हा 2014 ला मोदींनी कार्यभार स्वीकारला त्यावेळी राजकीय भ्रष्टाचाराने हिमालयाची उंची गाठली होती.

उदा: 2जी, कोल, कॉमनवेल्थ, स्पेक्ट्रम, इत्यादी.


कोळसा घोटाळ्यात तर स्वतः तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्यास सांगितले गेले. यावरूनच आपल्याला 2014 पूर्वीच्या घोटाळे-भ्रष्टाचार यांची व्याप्ती लक्षात येते.

   

त्यामुळेच हे सर्व नको होते म्हणून सामान्य जनतेने 2014 ला श्री नरेन्द्र मोदी यांना प्रधानमंत्री म्हणून निवडले. 


मोदींनी भ्रष्टाचार पूर्णपणे  संपवला असे मी म्हणनार नाही.

परंतु त्यांनी केंद्रीय स्तरावरील निर्णय ठीक केले. 


उदाहरणार्थ, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत सांगितले की, ते जेव्हा 1 रुपया केंद्रस्तरावरुन ते पाठवतात तेव्हा गरिबांना खाली पोहोचतपर्यंत फक्त 15 पैसे मिळतात. 


यामध्ये मोदीजींनी आधारकार्ड आणि जनधन खाते यांचा वापर करून गरिबांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावे म्हणून, हे सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. ज्यातुन भ्रष्टाचाराला आळा बसला. 


यासोबतच फौजदारी किंवा भ्रष्टाचाराच्या खटल्यांना सामोरे जात असलेले सरकारी कर्मचारी, अशा नोकरशाहीतील वाईट घटकांना काढून टाकण्याच्या प्रक्रिया केल्या गेल्या. जेणेकरून स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देता येईल.


2019 जूनपासून मोदी सरकारने दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्याच्या काही काळानंतर भ्रष्टाचारासह विविध आरोप असलेल्या कमिशनर-रँक अधिकाऱ्यांसह किमान 64 कर्मचार्‍यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सक्तीने सेवानिवृत्ती दिली आहे.


इतकेच नाहीतर माजी केंद्रीय मंत्री श्री पी. चिदंबरम यांना घोटाळ्याच्या आरोपात सीबीआईला अटक करण्याची मोकळीक ही दिली.

ही काही उदाहरणे आहेत, आणखीही देता येतील! 


यशाचा टप्पा अजूनही खुप दूर आहे. परंतु कमीतकमी भारताने भ्रष्टाचाराला मागे सारण्यास सुरुवात केली आहे. 


हे सगळे कसे शक्य झाले? 


राजकीय इच्छाशक्तीमुळेच हा फरक झाला आहे. 


तिसरा मोठा बदल हा मोदी सरकारने विशेषतः दुसर्‍या कार्यकाळात केलेला आहे तो म्हणजे, राष्ट्राला एकजुट करणे.


मोदींच्या अगोदर भारताचे राजकारण हे कोणतेही सरकार असले तरीही नेहरूवादी धोरणानेच पुढे नेले गेले आणि निवडणूक जाहिरनामा हे फक्त पोकळ आश्वासन असलेला कागद ठरला. 


परंतु, मोदींच्या काळात तिहेरी तलाक कायदा, कलम  370 रद्द करणे आणि नागरिकत्व कायद्यात सुधारणा, हे सर्व केले गेले.


त्यामुळे मोदींनी भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणाना आश्‍वासनांचा कागद न ठेवता त्याला देशाच्या धोरणात रूपांतरित करून, आपल्या निवडणूक जाहिरनाम्यातील गोष्टी पूर्णत्वास नेल्या. 


शेवटचा नमुद करण्यात गरजेचा असलेला आणि तितक्याच महत्वाचा म्हणजे बऱ्याच वर्षापासून रखड़लेले अखंड भारतातील सर्वांचे श्रद्धास्थान राम मंदिर. 


Image Sources : From media

अयोध्येत राम मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाच्या मंजुरीबरोबरच मोदींनी सरकार आणि भारत हे रामराज्य व्हावे, ही  संकल्पना मनोमन पूर्णत्वास यावी, असे वाटणाऱ्या लोकांमध्ये यशस्वीरित्या परस्पर संबंध निर्माण केला.  

हीच गोष्ट साधताना श्री अटलबिहारी वाजपेयी व त्यांचे सरकार यांना अस्वस्थता आलेली होती आणि त्यातून  त्यांचा वैचारिक आधार असलेल्या लोकांमध्ये दुरवस्था निर्माण झाली होती. 


परंतु, मोदी सरकारच्या काळात आश्चर्यकारक 


आंतरिक सुसंवाद  सरकार आणि वैचारिक आधार असलेल्या लोकांमध्ये दिसून आला. 


मोदींच्या प्रत्येक निर्णयातील चांगले आणि वाईट, यावर नक्कीच चर्चा होऊ शकतात.

परंतु जे आश्चर्यकारक होते ते म्हणजे त्यांचे धैर्य.  


राजकारणात बरेच  उतार-चढ़ाव असूनही भारतीय जनता पक्षाची उर्जा आणि चैतन्य का अबाधित राहिले आहे? 

हे देखील यातून स्पष्ट केले जाऊ शकते. 


मोदींनी आजघडीला देशातील जनतेच्या मोठ्या परिवाराला आपल्या सरकारचा भागधारक बनविला आहे आणि भारताचे पुनर्निर्माण केले जाऊ शकते, अशा अपेक्षेत बरेच हात निस्वार्थीपणे त्यांच्या मागे, पर्यायाने भाजपाच्या मागे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उभे आहेत, यात शंकाच नाही.

त्यातील एक अप्रत्यक्ष हात मी सुद्धा आहे, हे मी इथे आवर्जून नमुद करु इच्छीतो. ( No matter the Government, I will always sit in Opposition )


या 7 वर्षात मोदींनी सार्वजनिक जीवनातल्या अनेक प्रथा बदलल्या आहेत आणि अजुनही हे काम प्रगतीपथावर आहे. 

हे घडवून आणण्यासाठी, 


मोदींच्या भारताला 2024 मध्ये  नवीन उंची गाठावी लागेल. 


धन्यवाद!! 












केरळ आणि परिवर्तन | Kerala Story

  केरळ आणि परिवर्तन !



' असोल पोरीबोर्तन ' हे वाक्य सध्या ट्विटर, फेसबुक आणि न्यूज चॅनेल वर गाजत आहे. बंगाल मध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन होणं गरजेचं आहे पण त्याहून महत्वाचे राज्य मला वाटतं जिथे परिवर्तनाची गरज आहे ते म्हणजे ' केरळ ' आणि याची कारणं मी इथे नमूद करतो. 

केरळ मध्ये आत्ता ६०% हिंदू आहेत, तर १८% ख्रिश्चन, १६ % मुसलमान आणि बाकीचे ६%. एकेकाळी हिंदू बहुसंख्य असलेले राज्य हळू हळू करत हिंदू अल्पसंख्य होत चाललं आहे हे दिसत आहे आणि याचे कारण म्हणजे इथले बदललेले लोकसंख्याशास्त्र अर्थात DEMOGRAPHY.

टिपू सुलतान च्या काळात या भागाचे लोकसंख्याशास्त्र हिंदूंच्या विरोधात बदलले. जे म्हणून इस्लाम स्वीकारत नसे त्यांना तो मारत असे, मग ते हिंदू असो किंवा ख्रिश्चन आणि याला इतिहास साक्ष आहे. या सगळ्यात हळू हळू करत इस्लामिक धर्मांधांचे आणि ख्रिश्चन मिशनरीज चे बळ या भागांमध्ये वाढत गेले.

१९५६ ला केरळ या राज्याची स्थापना झाली आणि स्थापनेपासून इथे कायमस्वरूपी कम्युनिस्ट विचारधारेच्या आणि इस्लामिक विचारधारेच्या पक्षांचे सरकार राहिले आहे. या संपूर्ण कालखंडात हिंदूंच्या बाजूने मत मांडणाऱ्या लोकांचे किती बळी गेले आहेत हे आपण पहिलेच आहे.

रास्व संघाचे अनेक कार्यकर्ते, भाजपा चे अनेक कार्यकर्ते अनेक वेळेला राजकीय हत्येचे बळी पडले आहेत. कम्युनिस्ट पार्टीचा रक्तरंजित इतिहास सर्वश्रुत आहे. राजकीय विरोधकांना मारणे आणि गरीब, दीनदुबळे, दलित या सगळ्यांच्या रक्षणाचा आव आणणे हे त्यांच्या रक्तातच आहे.

कुम्मणम राजशेखरन, यांनी नमूद केले आहे कि LDF आणि युती मध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी , RSS  आणि BJP  च्या २५६ कार्यकर्त्यांना मारले आहे. पोलिटिकल किलिंग्ज हे ज्या ज्या ठिकाणी म्हणून कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात असतो त्या त्या ठिकाणी घडत आहेत ते इतिहास सांगतोच.

या पुढे जाऊन संपूर्ण देशातून सगळ्यात जास्त ISIS मध्ये जाणारा तरुण वर्ग हा केरळ मधला आहे. देशातील सगळ्यात सुशिक्षित असलेला प्रदेशमधून एवढे लोक ISIS मध्ये जातातच कसे ? आणि हीच जर तुमची LITERACY ची परिभाषा असेल तर मग दुर्दैव आहे. 

२०१२ ते २०१७ मध्ये NIA च्या एका रिपोर्ट प्रमाणे १७७ तरुण तरुणी ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून सीरिया किंवा इतर इस्लामिक राष्ट्रात जाऊन पुन्हा भारतात इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी आले.

या चौकशी मध्ये पकडल्या गेलेल्या एकाने सरळ सरळ नमूद केले कि त्याचा उद्देश ' जिहाद ' करणे आहे आणि इथे ' दारुल- इस्लाम ' स्थापना करणे आहे. यावर राज्यसरकारने काय पाऊल उचलले ? काहीही नाही !

आणि आपण कोणीही हे विसरू नये कि खिलाफत चळवळी मध्ये ज्या तीन गावांच्या हिंदूंना मारले गेले ती तीन गावे आजही इस्लामिक धर्मांधतेचा विळख्यात जखडली गेली आहेत .  गावांचे नावे एर्नाड, वाळूवनाड आणि पोन्नानी.

लव्ह जिहाद थोथांड आहे म्हणणारे PFI ( पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ) या इस्लामिक संस्थेच्या वक्तव्यावर विश्वास  का ठेवत नाहीत हे माहित नाही.

सत्या सारीनी ( PFI च्या अंतर्गत असलेली एक संस्था ) च्या अध्यक्ष असलेल्या झैनाब हिने मान्य केले कि त्यांचा उद्देश ' अनेकांना खासकरून मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हा आहे ". हे इंडिया टुडे च्या २०१८ च्या रिपोर्ट मध्ये नमूद आहे. 

https://t.co/5C7w9tbpPj


सत्या सारीनी ( PFI च्या अंतर्गत असलेली एक संस्था ) च्या अध्यक्ष असलेल्या झैनाब हिने मान्य केले कि त्यांचा उद्देश ' अनेकांना खासकरून मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हा आहे ". हे इंडिया टुडे च्या २०१८ च्या रिपोर्ट मध्ये नमूद आहे. म्हणजे नकळत पणे काँग्रेस जी स्वतःला धर्मनिरपेक्ष पार्टी दाखवते ती सुद्धा या सगळ्यात सहभागी आहे.  केरळ मध्ये सापडले जाणारे तरुण जे दहशतवादी संघटनांशी थेट जोडले गेले आहेत, नंतर अशी घडणारी धर्मांतरे, हिंदूंची कमी होणारी लोकसंख्या, हिंदूंच्या त्यांच्या धर्मस्थळांवरती नसलेला अधिकार आणि HIGHEST LITERACY RATE या नावाखाली अनेक वर्ष केली गेलेली फसवणूक या सगळ्या गोष्टींकडे पाहता, इथे खर्यार्थाने परिवर्तनाची गरज आहे असं मला वाटतं. कम्युनिस्ट पक्ष असो...

किंवा जिहादी विचारांनी प्रेरित असलेले पक्ष एकाच माळेचे मणी आणि आपल्याला अजून एक मोठा धोका म्हणजे ' CHRISTIAN CONVERSIONS ' जी दक्षिण भारतात खासकरून तामिळनाडू आणि केरळ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर  चालू आहेत, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.

आशा करूया कि येत्या काही दिवसात ' GODS OWN COUNTRY ' मध्ये परिवर्तन घडेल.