ミ★ मोदींचा भारत ★彡
आज भारत देश हा मुख्यत्वे दोन कालखंडात विभागला जातो. एक म्हणजे मोदी 2014 ला येण्यापूर्वीचा आणि दुसरा म्हणजे मोदी 2014 ला आल्यानंतरचा ते आजपर्यंत.
मोदी येऊन आज सात वर्ष पूर्ण होत आहेत.
आपण मोदींना दोनदा निवडून यासाठी दिले होते. कारण, आपल्याला बदल हवा होता.
मग खरोखर काही बदल झालेत का? हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात आहे.
या सात वर्षात भारतामध्ये काही ठळक बदल घडून आले जे मी आपल्यासमोर इथे मांडणार आहे.
सर्वात महत्वाचा आणि पहिला बदल म्हणजे,आजच्या भारतात, जे लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत ते क्वचितच कोणाचे तरी वारसदार आहेत. परंतु, 2014 पर्यंत जी परंपरा चालत आली, त्यात स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, बडे सरकारी अधिकारी, फिक्सर्स- ज्यांच्याजवळ मोठ्या घराण्यातील लोकांची ओळखी आणि कनेक्शन होते, असेच लोक हे प्रशासनात होते.
परंतु, 2014 नंतर त्यांच्याजागी नवीन लोक आले - जे चमक धमक न ठेवता कामावर लक्ष देतात आणि ज्यांची देशाची समज चांगली आहे, त्यांना अधिक चांगल्याप्रकारे लोकांमध्ये मिळून मिसळून काम करता येते, ते पक्षपात करीत नाहीत आणि पक्के राष्ट्रवादी आहेत.मुख्य म्हणजे ते हिंदू असल्याबद्दल त्यांना चीड़ येत नाही आणि सोबतच ते तंत्रज्ञान आणि विज्ञानाची सांगड सहजपणे घालतात.
हा एक नवीन भारत आहे, ज्याची "मोदींचा भारत" अशी व्याख्या केली जाते आणि त्याला सामाजिक आधार बनवून कार्यक्षम वितरण, उद्योजकता आणि स्पर्धात्मक बाजारपेठेवर भर देतो. दुसरा मोठा बदल म्हणजे, 2014 पूर्वी असलेली भ्रष्टाचाराची लाट आता ओसरत आहे.
जेव्हा 2014 ला मोदींनी कार्यभार स्वीकारला त्यावेळी राजकीय भ्रष्टाचाराने हिमालयाची उंची गाठली होती.
उदा: 2जी, कोल, कॉमनवेल्थ, स्पेक्ट्रम, इत्यादी.
कोळसा घोटाळ्यात तर स्वतः तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्यास सांगितले गेले. यावरूनच आपल्याला 2014 पूर्वीच्या घोटाळे-भ्रष्टाचार यांची व्याप्ती लक्षात येते.
त्यामुळेच हे सर्व नको होते म्हणून सामान्य जनतेने 2014 ला श्री नरेन्द्र मोदी यांना प्रधानमंत्री म्हणून निवडले.
मोदींनी भ्रष्टाचार पूर्णपणे संपवला असे मी म्हणनार नाही.
परंतु त्यांनी केंद्रीय स्तरावरील निर्णय ठीक केले.
उदाहरणार्थ, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत सांगितले की, ते जेव्हा 1 रुपया केंद्रस्तरावरुन ते पाठवतात तेव्हा गरिबांना खाली पोहोचतपर्यंत फक्त 15 पैसे मिळतात.
यामध्ये मोदीजींनी आधारकार्ड आणि जनधन खाते यांचा वापर करून गरिबांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावे म्हणून, हे सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. ज्यातुन भ्रष्टाचाराला आळा बसला.
यासोबतच फौजदारी किंवा भ्रष्टाचाराच्या खटल्यांना सामोरे जात असलेले सरकारी कर्मचारी, अशा नोकरशाहीतील वाईट घटकांना काढून टाकण्याच्या प्रक्रिया केल्या गेल्या. जेणेकरून स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देता येईल.
2019 जूनपासून मोदी सरकारने दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्याच्या काही काळानंतर भ्रष्टाचारासह विविध आरोप असलेल्या कमिशनर-रँक अधिकाऱ्यांसह किमान 64 कर्मचार्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सक्तीने सेवानिवृत्ती दिली आहे.
इतकेच नाहीतर माजी केंद्रीय मंत्री श्री पी. चिदंबरम यांना घोटाळ्याच्या आरोपात सीबीआईला अटक करण्याची मोकळीक ही दिली.
ही काही उदाहरणे आहेत, आणखीही देता येतील!
यशाचा टप्पा अजूनही खुप दूर आहे. परंतु कमीतकमी भारताने भ्रष्टाचाराला मागे सारण्यास सुरुवात केली आहे.
हे सगळे कसे शक्य झाले?
राजकीय इच्छाशक्तीमुळेच हा फरक झाला आहे.
तिसरा मोठा बदल हा मोदी सरकारने विशेषतः दुसर्या कार्यकाळात केलेला आहे तो म्हणजे, राष्ट्राला एकजुट करणे.
मोदींच्या अगोदर भारताचे राजकारण हे कोणतेही सरकार असले तरीही नेहरूवादी धोरणानेच पुढे नेले गेले आणि निवडणूक जाहिरनामा हे फक्त पोकळ आश्वासन असलेला कागद ठरला.
परंतु, मोदींच्या काळात तिहेरी तलाक कायदा, कलम 370 रद्द करणे आणि नागरिकत्व कायद्यात सुधारणा, हे सर्व केले गेले.
त्यामुळे मोदींनी भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणाना आश्वासनांचा कागद न ठेवता त्याला देशाच्या धोरणात रूपांतरित करून, आपल्या निवडणूक जाहिरनाम्यातील गोष्टी पूर्णत्वास नेल्या.
शेवटचा नमुद करण्यात गरजेचा असलेला आणि तितक्याच महत्वाचा म्हणजे बऱ्याच वर्षापासून रखड़लेले अखंड भारतातील सर्वांचे श्रद्धास्थान राम मंदिर.
Image Sources : From media |
अयोध्येत राम मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाच्या मंजुरीबरोबरच मोदींनी सरकार आणि भारत हे रामराज्य व्हावे, ही संकल्पना मनोमन पूर्णत्वास यावी, असे वाटणाऱ्या लोकांमध्ये यशस्वीरित्या परस्पर संबंध निर्माण केला.
हीच गोष्ट साधताना श्री अटलबिहारी वाजपेयी व त्यांचे सरकार यांना अस्वस्थता आलेली होती आणि त्यातून त्यांचा वैचारिक आधार असलेल्या लोकांमध्ये दुरवस्था निर्माण झाली होती.
परंतु, मोदी सरकारच्या काळात आश्चर्यकारक
आंतरिक सुसंवाद सरकार आणि वैचारिक आधार असलेल्या लोकांमध्ये दिसून आला.
मोदींच्या प्रत्येक निर्णयातील चांगले आणि वाईट, यावर नक्कीच चर्चा होऊ शकतात.
परंतु जे आश्चर्यकारक होते ते म्हणजे त्यांचे धैर्य.
राजकारणात बरेच उतार-चढ़ाव असूनही भारतीय जनता पक्षाची उर्जा आणि चैतन्य का अबाधित राहिले आहे?
हे देखील यातून स्पष्ट केले जाऊ शकते.
मोदींनी आजघडीला देशातील जनतेच्या मोठ्या परिवाराला आपल्या सरकारचा भागधारक बनविला आहे आणि भारताचे पुनर्निर्माण केले जाऊ शकते, अशा अपेक्षेत बरेच हात निस्वार्थीपणे त्यांच्या मागे, पर्यायाने भाजपाच्या मागे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उभे आहेत, यात शंकाच नाही.
त्यातील एक अप्रत्यक्ष हात मी सुद्धा आहे, हे मी इथे आवर्जून नमुद करु इच्छीतो. ( No matter the Government, I will always sit in Opposition )
या 7 वर्षात मोदींनी सार्वजनिक जीवनातल्या अनेक प्रथा बदलल्या आहेत आणि अजुनही हे काम प्रगतीपथावर आहे.
हे घडवून आणण्यासाठी,
मोदींच्या भारताला 2024 मध्ये नवीन उंची गाठावी लागेल.
धन्यवाद!!
Post a Comment