Translate

Showing posts with label Shivrajyabhishek Sohala. Show all posts
Showing posts with label Shivrajyabhishek Sohala. Show all posts

"शिवराज्याभिषेक सोहळा"

  

जगाच्या इतिहासातील एक दैदिप्यमान सोहळा 

"शिवराज्याभिषेक सोहळा"


Picture Credit : Shivrajyabhishek Sohala : wallpapercave


शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक ऐतिहासिक घटना होती. एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल संपूर्ण पृथ्वीचे मालक म्हणून मिरवणारा औरंगजेब जिवंत असताना जे शक्य नव्हते ते शिवाजी महाराजांनी करून दाखवले होते. 

उत्तर भारतातील फक्त महाराणा राजसिंह आणि दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांची मुघालांसोबात मैत्री किंवा तह नव्हता.

६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी,शुक्रवारी,शके १५७६, 


हिंदू साम्राज्य दिवस म्हणजेच "शिवराज्याभिषेक_सोहळा" तिथीअनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला पार पाडला होता आणि तारखेनुसार 6 जून 1674 ला पार पाडण्यात आले ।


रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. 

Picture Credit : शिव सिंहासन : instagram


रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ज्या दिवसासाठी शतका पासून पूर्ण देश आणि महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होत की आपल्या राज्यातील राजाचं राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यात यावे ते या दिवशी स्वप्नपूर्ती झाले ।

हिंदू साम्राज्य स्थापित झाले , वर्षानुवर्षे इस्लामिक राजवटी या अंधारात ज्योती प्रकट झाली ।


राज्याभिषेक सोहळा किती दिमाखदार असेल किती भव्य असेल याचं प्रत्य अनेक लिखाण मध्ये सुरेख वर्णनं केले आहे। श्रीमान योगी या कादंबरीत भाग आठवा मध्ये तपशील माहिती देण्यात आली आहे । तो सुवर्ण क्षण आपण पाहिलं नसला तरी ते अनुभव घेता येईल असं त्याचं वर्णन केले आहे।


साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले.कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले. राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली.


"राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये, शिवा न्हावी कितीही जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.


राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली ” राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.


राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला. तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली “ राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. ” राजे धळाधळा रडू लागले.


साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू … तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजे आज आनंदाचा दिवस आणि तुम्ही रडताय. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे मला सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले ”


राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? ” राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात ” हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे,

या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको.”


स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.


जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात.


शिवराज्याभिषेक सोहळा - महत्त्व 

Picture Credit : हिंदवी स्वराज्य : dreamstime

आज आपण शिवराज्याभिषेकाकडे एक सोहळा म्हणून पहातो पण त्या काळात शिवराज्याभिषेकाचे महत्व अनन्यसाधारण असे होते.आणि त्याची निकड ही तेवढीच होती. काहीजण म्हणतात की राज्याभिषेक केला नसता तरी चाललं असत कारण शिवाजी महाराज राजे होते आणि सर्वमान्य होते. मला असं वाटत की ही गोष्ट चूक आहे, कशी ते पाहू.


🔸 स्वराज्य एक तात्विक आणि राजकीय अधिष्ठान :-

त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्यात मुघल,नवाब,राजपूत, निजामशाही, कुतुबशाही, डच, इंग्रज, फ्रेंच इ च्या नजरेमध्ये स्वराज्य हे मराठ्यांचे बंड होते यापेक्षा जास्त काही नाही. मुघल किंवा या इतर राज्यकर्त्यांना विचारल्याशिवाय काही कर, व्यापार, करता येत नव्हते. या गोष्टी संपवण्यासाठी हा अभिषेक गरजेचा होता. त्याशिवाय स्वतंत्र प्रतिमा तयार होऊ शकली नसती.

एक जबाबदार,स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून तत्कालीन भारतात नावारूपास यायला हा राज्याभिषेक मैलाचा दगड ठरला.

राज्याभिषेक झाला म्हणूनच नंतर मराठ्यांनी जे पराक्रम केले त्यांना आज इतिहासात जे मनाचे स्थान आहे ते कदाचित फक्त एक बंड म्हणून राहिले असते. सुरतेच्या लुटी, इतर मोहिमांतील लुटी यामुळे जी प्रतिमा तयार होत होती ती राज्याभिषेकामुळे बदलून एक स्वतंत्र अभिषिक्त राजाची तयार झाली.


🔸जन मानसिकता आणि रूढी:-

स्वतंत्र राज्य आणि त्याचा अभिषिक्त राजा तयार झाला म्हणजे सगळं झालं असं नाही. शिवपूर्वकाळातील इस्लामी राजवटींनी ज्या प्रथा पडल्या होत्या त्या मुळे सामान्य जनतेच्या मनात जे न्यूनगंड होते, जी भीती होती ती घालवणे ही गरजेचे होते. त्यासाठी शिवशक सुरू करणे, स्वतंत्र चलन जे की शिवराई, आणि होन होते ते सुरू करणे, राज्यव्यवहारकोश लिहून घेणे, आणि सर्वात मोठे म्हणजे हिंदू परंपरेने राज्याभिषेक करवून घेणे जो की त्या पूर्वी 400 वर्षात झाला नव्हता. यामुळे हे हिंदवी स्वराज्य आहे हे ठणकावून सांगितलं गेलं.

प्रशासनातून अनेक फारसी शब्द काढून टाकण्यात आले आणि त्याठिकाणी प्राकृत आणि संस्कृत शब्द आणण्यात आले, अनेक राजकीय नियम आणि राजशिष्टाचार बदलले गेले, नवीन झेंडा तयार केला  गेला ज्यावर भगव्या जरीपटक्यावर सिह दाखवण्यात आला, तो राज्याभिषेकाचे प्रतीक होता. 


🔸राजकीय दूरदृष्टी :- 

स्वराज्य बळकट झाल्यानन्तर अखिल हिंदुस्थानातल्या हिंदू राजांना एकत्र करून जुलुमी इस्लामी राजवटीना एक तुल्यबळ आव्हान उभे करणे आणि यासाठी गरजेचे होते ते म्हणजे स्वतः एक स्वतंत्र अभिषिक्त राजा असणे. 


🔸अंतर्गत बंडाळी विरुद्ध चा भीमटोला :-

स्वराज्याला बाहेरचे होते तेवढेच अंतर्गत शत्रू ही होते ,  राज्याभिषेक झालेला नव्हता तो पर्यंत ते ही या स्वराज्याला एक बंड च मानत होते. त्यांच्यासाठी ही एक सणसणीत चपराक म्हणता येईल.


🔸प्रस्थापीतांविरुद्ध चे रणशिंग :-

त्याकाळातील नियमानुसार हिंदुस्थानात कोणाला जर ताजपोशी किंवा राज्याभिषेक करायचा असेल तर बादशहाची परवानगी घेणे अनिवार्य होते. महाराजांनी ही परवानगी न घेता राज्याभिषेक केला, या कृतीतून त्यांनी स्पष्ट केले की मराठे तुम्हाला जुमानत नाहीत.आमच्याच मातीत आम्ही राज्य करण्यासाठी तुम्हा परकीयांची परवानगी घेण्याचा प्रश्नच नाही.


🔸नवीन उदयास येणाऱ्या राज्यकर्त्यांना इशारा :-

डच, इंग्रज, फ्रेंच हे नवीन उदयास येणारे राज्यकर्ते होते, राज्याभिषेकातून त्यांना ही इशारा गेला की आपण ज्याविरुद्ध लढण्याची स्वप्न पहात होतो तो एक अभिषिक्त राजा आहे. 


🔸जन अभय :- 

गेल्या 400 वर्षात गुलामगिरी आणि जुलुमाने पिचून गेलेल्या जनतेला अभय निर्माण होऊन तुम्ही आता एक स्वतंत्र राज्याचे नागरिक असून आता घाबरण्याची गरज नाही असा काहीसा संदेश महाराजांनी राज्याभिषेकातून दिला.


असे अनेक संदेश आणि राजकीय आव्हाने तयार केली गेली तसेच स्वराज्याला तात्विक, धार्मिक, आभिमानस्पद अधिष्ठान बनवण्याचे उदात्त कार्य म्हणजे शिवराज्याभिषेक.


शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे फक्त दिखावा करण्यासाठी निर्माण केलेले राज्य नव्हते ते हिंदवी स्वराज्य होते.बाकीच्या कोणत्याही साम्राज्य मध्ये आणि राजेंच्या हिंदवी स्वराज्य मध्ये खूप मोठा फरक आहे.राजेंचे होते ते स्वराज्य होते म्हणजेच स्वतःचे राज्य.या राज्यात राहणाऱ्या रयतेला वाटत होते की हे माझे स्वराज्य आहे. या माझ्या स्वराज्यासाठी प्राण गेले तरी चालेल पण याचे रक्षण आम्ही करणार कारण रयतेला माहिती होते राजे जे काही करत आहेत ते आमच्यासाठीच करत आहेत स्वतः साठी कष्ट करत नाहीत.


हिंदवी स्वराज्य हे धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलरवादी होते असे दाखवण्याचा अट्टाहास नक्की कशासाठी ?


मी एक छत्रपतींनी केलेल्या कार्याचे उदाहरण देतो आहे त्याचा उल्लेख कुणीही करत नाही हे गुलामगिरी व गुलामांचा व्यापार शी संबंधात आहे.शिवाजी महाराज हे जगातील पहिले राजे होते गुलामांचा व्यापार बंद करणारे,पण आपल्या सर्वांना शिकवले जाते की अब्राहम लिंकन ने गुलामगिरी बंद केली.अमेरिकेत गुलामगिरी प्रथेविरुद्ध १ जानेवारी १८६३ ला ऑर्डर काढली होती पण राजेंनी ऑर्डर २६ ऑगस्ट १६७७ "हे माझे राज्य आहे आणि मी राजा असेपर्यंत इथे गुलामांचा व्यापार होणार नाही" ही आज्ञा राजेंनी १६७७ मध्ये जेंव्हा कर्नाटक वर स्वारी केली होती त्यावेळी दिली होती व सांगितली होते की मुस्लिमांच्या राज्यात गुलामांचा व्यापार चालत असेल पण माझ्या राज्यात हे चालणार नाही आणि जर हा नियम कुणी मोडला तर माझे सैनिक तुमच्यावर कारवाई करतील.या घटनेचा उल्लेख डच ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड१६७७ मध्ये आहे.बरं हे झालं गुलाम गिरी च्या बाबतीत आपण अजून एक राजेंच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या सुरवातीच्या काळातील एक छोटेसे उदाहरण समजून घेऊ मग त्यावरून राजेंची विचारसरणी नक्की कशी असावी याचे उत्तर मिळू शकते.


आता सर्वांनाच माहिती आहे हिंदवी स्वराज्य च्या लढाईचे प्रतीक हे हजारो वर्षांपासून सनातन हिंदू धर्माचा प्रतीक असणारा पवित्र असा भगवा ध्वज आहे.हिंदवी स्वराज्य वर सुरवातीला आलेल्या संकटा पैकी एक मोठं संकट म्हणजे च फत्तेखान ची स्वारी १६४८ त्याची छावणी बेलसर (पुरंदर तालुका)येथे होती.त्यावेळी राजे पुरंदर वरच होते तेंव्हा तिथे ठरले की गनिमी कावा वापरून त्या खानाला धडा शिकवायचा.मग फौजेची तयारी झाली व राजेंचा निरोप घेऊन सैनिकांच्या काही तुकड्या निघाल्या त्यात एक भगव्या झेंड्याची तुकडी पण होती, त्यात एका सैनिकाच्या हातात झेंडा दिलेला होता.त्यानंतर मराठे खानाच्या छावणीवर तुटून पडले.त्यात घनघोर युद्ध सुरू झाले काही वेळानंतर ठरल्या प्रमाणे आपले सैनिक माघारी फिरले पण झेंड्याची तुकडी माघारी फिरलीच नाही ते तसेच लढत राहिले काही वेळाने खानाच्या फौजे ने त्यांना घेरले व अशी स्थिती निर्माण झाली की. ते सैनिक पण मरणार आणि झेंड्याचा पण अपमान होणार पण इतक्यात बाजी जेधे- देशमुख म्हणजेच कान्होजी जेधे यांचे पराक्रमी पुत्र तिथे माघारी आले व त्या गर्दीत घुसून झेंडा वाचवला व झेंडा घेऊन माघारी आले त्याचबरोबर बाकीचे सैनिक पण पुरंदर वर परतले.हे सर्व जेव्हा राजेंना समजले तेंव्हा राजेंनी बाजी जेधे चा सन्मान केला कारण त्यांनी भगव्या झेंड्याचा सन्मान राखला व भगव्याचा अपमान होऊ दिला नाही.


मग आता तुम्हीच सांगा ही लढाई भगव्याची होती,धर्माच्या सन्मानाची होती म्हणूनच हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु लोकांवर अन्याय करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या तसेच त्यांचे जबरदस्ती ने धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिश्चन पोर्तुगीज व मिशनरी लोकांना राजेंनी कसा धडा शिकवला हे समजून घेतले पाहिजे. इसवी सन १६६७ मध्ये  हिंदुंवर अतोनात अन्याय करणाऱ्या पोर्तुगिजांना धडा शिकवण्यासाठी राजेंनी गोव्यावर आक्रमण केले आणि तेथील हिंदुंवर. अन्याय करणाऱ्या चार मिशनरी म्हणजेच पादरींना  पकडले व त्यांना सांगितले की हिंदू वर चालू असणारा अन्याय थांबवा व तुम्ही चौघे पण हिंदु बना पण त्यांनी नकार दिला होता तेंव्हा राजेंनी त्या चौघांचे पण मुंडके उडवले होते आणि गोव्यात प्रचंड नासधूस केली होती. हा पोर्तुगिज राज्यकर्त्यांना दिलेला एक इशारा होता की जर हिंदुंवर अत्याचार कराल तर तुमची अशी अवस्था केली जाईल.पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी पण याच पद्धतीने मिशनरी ना करवती ने कापून पाठवून दिले होते.इसवी सन १६६८ मध्ये शिवाजी महाराजांनी गोव्याच्या किनाऱ्यावर असणारे श्री सप्तकोटिश्र्वर शंकर चे मंदिर पुन्हा बांधायला सुरुवात केले होते.हे मंदिर ख्रिश्चन तसेच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले होते.हे मंदिर पंचगंगा नदीच्या तीरावर नारावे या गावात आहे.हे मंदिर गोव्यातील प्राचीन कदंब राजांचे कुलदैवत होते.तिथे राजेंनी कोरलेला शिलालेख पण आहे.मग विचार करा राजे हिंदू धर्म विरोधी लोकांनी नष्ट केलेले हिंदूंचे मंदिर पुन्हा एकदा बांधून कोणता संदेश देत आहेत?.कोणता आदर्श आपल्या समोर ठेवत आहेत?.तो आदर्श आहे आपण आपल्या महान अश्या सनातन हिंदू धर्माचे रक्षण करायचे आहे.


यासाठी अजून एक उदाहरण आहे ते दक्षिण स्वारी चे राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर राजेंनी दक्षिण स्वारीची सुरुवात केली.१६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकला त्यानंतर महाराज तिरुवन्नमल इस येथे गेले तेथील समोत्तिरपेरूमल देवाच्या दोन मंदिरांच्या मशिदी करण्यात आल्या होत्या.महाराजांनी त्या मशिदी चे परत भव्य मंदिरात रूपांतर केले व शिवलिंग स्थापन केले होते.१६७२ ते १६८१ या काळात भारतात. राहिलेल्या जॉन फ्रायर ने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की शिवाजी महाराज कल्याण व भिवंडी भागातल्या मशिदी पाडूनच टाकणार होते पण तसे न करता त्यांचा वापर धान्य ठेवायची गोदाम साठी होतो आहे.तसेच हाच उल्लेख कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत मध्ये पण आहे.


मग या सर्व घटनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला राजे कोणत्या दृष्टीने सेक्युलर वादी वाटतात. दुसऱ्याचा धर्माचा सन्मान करणे ही गोष्ट वेगळी आहे आणि जर दुसरे आपल्या धर्माचा सन्मान करत नसतील व आमाचा महान धर्म संपवू पाहतात त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणे ही गोष्ट वेगळी आहे.राजेंनी दुसऱ्या धर्माचा. सन्मान जरूर केला आहे पण म्हणून त्यांच्यावर एकतर्फी प्रेम केलेलं नाही. जर दुसऱ्या धर्माचे लोक आमच्या धर्मावर हल्ला करणार असतील तर आम्ही पण आमच्या महान धर्माचे रक्षण करण्यास समर्थ आहोत हे महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे आणि आम्ही पण हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्य जगतो आहे. देश, धर्म, संस्कृती यासाठीच लढायचे अन् यासाठीच जगायचे.


राजेंचे नक्की ध्येय काय होते यासाठी एक शेवटचे उदाहरण देतो आहे.फ्रेंच प्रवासी बार्थेलेमी कॅरे हा दोन वेळा शिवाजी महाराजांच्या काळात भारतात येऊन गेला होता व महाराष्ट्र मध्ये पण येऊन गेला होता.त्याने त्याच्या प्रवास वर्णन चे प्रकाशन १६९९ मध्ये पॅरिस येथे केले होते व त्याने राजेंना महान राजे असे लिहिले होते.तसेच पूर्वेकडील प्रवासात पाहिलेला सर्वात महान व्यक्ती असे वर्णन केले आहे. तसेच पुढे लिहितो की शिवाजी महाराज यांचे सरदार तसेच सैनिकांना तुमच्या राजाचं नक्की स्वप्नं काय आहे ?


असे विचारले की सांगतात की आमच्या छत्रपतींचे स्वप्नं आहे की आमचे हिंदवी स्वराज्य दिल्लीपासून, बंगालच्या उप महासागर पर्यंत पसरलेले असावे ,यावरून आपण समजू शकतो की राजेंचा उद्देश नक्की काय होता.व या सर्व गोष्टी वरून आपल्या सर्व मावळ्यांना ध्येय निश्चित करायचे आहे.

जय शिवराय 🙏🏻




@BhagirathShelar