राजकारण आणि EDशाही

विरोधी पक्षातील नेते असो किंवा त्यांचे चेले चपाटे त्यांच्याकडून आजकाल सर्वात जास्त विचारला जाणार प्रश्न म्हणजे.. 

- ईडी फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच छापे का टाकते ? 

हा प्रश्न ऐकल्यावर मला तो काळ आठवला जेव्हा सामान्य लोक म्हणायचे की सर्व नेते जनतेसमोर पक्षीय राजकारण करतात. आणि आपल्या समोर मुद्दामहून भांडण्याच किंवा एकमेकांवर टीका करण्याचं नाटक करतात, पण आतून सगळे एकमेकांना मिळालेले असतात. आणि आळीपाळीने सत्तेत येऊन जनतेच्या तिजोरीची लूट करतात. खर सांगायच तर आता ती सामान्य जनता मिळणे ही कठीण झाली आहे, जे म्हणायचे सगळे नेते सारखेच असतात पण आता त्यांचे शब्द बदलले आहेत. स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तीच सामान्य जनता आता पक्षीय राजकारणात पूर्णपणे विभागली गेली आहे, एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला. मोदीजींचे काम बहुसंख्य जनतेला आवडते आणि त्यांचा मजबूत पाठिंबा ही आहे आणि त्यावर विरोधकांनी किती ही कटकारस्थाने केली तरी. त्यांच्या प्रतिमेला कनभर ही तडा जाणार नाही. आणि जो पर्यंत मोदीजी सक्रिय राजकारणात आहेत तो पर्यंत त्यांना चॅलेंज ही नाही. पणं जी विरोधी पक्षातील जनता आहे त्यांचं रडगाण पुन्हा इथेच येऊन थांबते की ईडीचे छापे फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का पडतात ? सत्ता ही बदलत राहणारी बाब आहे. एकाच पक्षाकडे ती नेहमीच असेल असे शक्य नाही. उद्या जर सत्ता आज जे विरोधी आहेत त्यांच्या हाती गेली तर ते ही छापे टाकतील. पण आज जे प्रश्न विचारत आहेत त्यांना माझा ही प्रती प्रश्न आहे की, आजचे विरोधी २०१४ पूर्वी सत्ताधारी होते त्यावेळी त्यांनी त्यावेळच्या विरोधकांवर छापे का टाकले नाहीत ? जर त्यावेळी तुम्ही छापे टाकू शकत नव्हतात तर मग त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो की त्यावेळचे विरोधी भ्रष्टाचारी नव्हते. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ६० वर्षापासून काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष निरंतर सत्तेत असल्यामुळे घोटाळ्यांचा माल त्यांच्याकडेच होता. भाजप त्यावेळी ही सिंगल लार्जस्ट पार्टी होती आणि आज ही आहे. विरोधक ईडी व भाजप वर आरोप करण्यापूर्वी हे विसरतात की यांच्याच घोटाळ्याना कंटाळून देशातील जनतेने मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजप ला स्पष्ट बहुमत दिले व त्यावेळी प्रचारा मध्ये भ्रष्टाचार घोटाळे हेच प्रमुख मुद्दे होते आणि त्या आधारेच इलेक्शन कँपैन राबवलं गेलं. आणि मोदीजी प्रत्येक भाषणात सांगत होते की "70 साल मे जो भी खाया हूआ माल हैं वो ब्याज समेत देश की तिजोरी मे जमा करुंगा." आणि मोदीजींचा स्वतःचा नारा होता की "ना खाऊंगा ना खाणे दुंगा." एका गोष्टीचं कौतुक करण्यासारखे आहे , जर आजचे सत्ताधारी भ्रष्ट नेत्यांवर ज्या प्रकारे कारवाई करत आहे , प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जप्त करत आहेत म्हणजे यांना ही या गोष्टीची जाणीव असेलच की भविष्यात आपण विरोधात गेल्या नंतर आपल्याला ही परिक्षा द्यावी लागणार आणि ते कसलीही ही परवा न करता "राष्ट्र प्रथम" या पंक्तीला स्मरून स्वतःला पूर्ण झोकून देऊन राष्ट्र कार्य पार पाडत आहेत. आणि त्यांना पूर्ण जाणीव आहे की आजची सत्ता भ्रष्टाचार मुक्त ठेवणे क्रमप्राप्त आहे आणि तेव्हाच आपण परीक्षेत यशस्वी होऊ. 

टीप - भविष्यात जे घडायचं असेल ते घडेल.. पणं आता जे काही घडतय ते पाहून मनाला एक प्रकारे समाधान मिळत आहे. घराणेशाही ने देश अक्षरशः पोखरून काढला, पुढील २५ पिढ्यांची सोय आताच करून ठेवली. इंग्रज, मुघलानंतर देशाची सर्वात जास्त लूट कोणी केली असेल तर याच भ्रष्ट राजकारण्यांनी. देशाच्या संपत्तीला बापाची जहागीर समजून हुकूमत गाजवत होते हरामखोर.. 

परंतु एक मोदी काय आला आणि ह्या सर्वांची शिस्तीत लंका लावली. ! 

जय हिंद ! 🇮🇳 
 

@ReactingWords

Post a Comment

Previous Post Next Post