दिव्या दिव्या दिपत्कार
काशी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार |
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळसीपाशी
आमचा नमस्कार सर्व देवांच्या चरणापाशी ||
दीप अमावस्येच्या च्या सर्वांना शुभेच्छा.🙏🏻
आपल्या हिंदू सणांना बदनाम करायचे काम नेहमी हिंदूंकडूनच केले जातं....
दीप अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे, मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये, हे नामकरण काही पिदोड्या लोकांनी केले आहे व त्यांच्या व्यापारात ज्यांचे आर्थिक हितसंबध गुंतले आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे. या सणाला घरातले सर्व दिवे धुवून पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण, गटारी अमावस्या न म्हणता अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी दीपपूजन दीप अमावस्या असे म्हणतात..! दर्श अमावस्या म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका.
कोणताही धर्म ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात. या दिवशी घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे वेळीच सावध व्हावे, उद्या महाराष्ट्र तील नवीन पिढीला वाटेल धर्मच गटारी साजरी करायला लावतो, आणि या दिवशी भरपूर दारू प्यावी.
PC :BhagirathShelar instagram wall |
आपल्या कडे दर्श अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे तो) किंवा दिप अथवा दर्श अमावस्या असे म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांची नावे हि संस्कृत भाषेवर आधारित आहेत. "Gutter" हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय.
आपल्या महान सनातन संस्कृतीची जाणीव ठेवा... आपल्या प्रत्येक सणाला एक मोठा आणि गहन अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुठलाही सण करू शकत नाही. म्हणूनच आपले सण आपणच आपल्या संस्कृतीनुसार साजरे करू या....
गटार(Gutter) नव्हे, गताहार
गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते
आहार = भोजन
गत+आहार = गताहार
जसे...
शाक+आहारी = शाकाहारी
तसे....
गत+आहारी = गताहारी
गत+आहारी+अमावस्या=गताहारी अमावस्या
या दिवशी देवघरातील दीप पुजन करतात.....
येत्या रविवारी ८ऑगस्ट २०२१ रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्वजातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते.
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.
---आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे.त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
---या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या आणि रानभाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.
तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करा, सणाला विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती 🙏🏻
श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा.....!!
@BhagirathShelar
Dhanyavad ya mahitisathi
ReplyDeleteधन्यवाद सर, वाचाल्याबद्दल..
DeletePost a Comment