संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे आणि कोंग्रेस मात्र गलीच्छ राजकरणात मग्न आहे हे #CongressToolkit वरून सिद्ध झालं. पानं वाचताना मला या पक्षाचे समर्थन करणाऱ्या लोकांच्या बुद्धीच कीव आली. देशामध्ये अराजकता माजवणे हा काँग्रेस चा डाव मुळीच नवीन नाही.
या आधीही अनेक प्रसंगी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असे केलेलेच आहे. एक एक पान वाचताना प्रत्येक पॉईंट हा केवळ देश विरोधी अजेन्डा राबवण्यासाठीच लिहिला गेला आहे हे दिसून आले.
पान क्र.१ वरील ठळक मुद्दा : "हिंदूंच्या कुंभ मेळ्याला "SUPERSPREADER " म्हणा परंतु इतर धर्माच्या धार्मिक सभांना काहीही बोलू नका अथवा त्यावर काही टीका टिपणी करू नका असे त्या AICC च्या डॉक्युमेंट मध्ये सांगितले गेले आहे. यावरून हिंदू विरोधी कोण आहे हे सुजाण नागरिकांना कळेलच.
पान क्र.१ वरील दुसरा मुद्दा: "आंतराष्ट्रीय स्तरावर विविध (मैत्री असलेल्या) पत्रकारांना हाताशी धरून कुंभ मेळ्याचे कारण वापरून भाजपाची बदनामी करा." आंतराष्ट्रीय स्तरावर जेव्हा बदनामी होते तेव्हा ती पक्षाची नाही ती देशाची होते एवढं साधं यांना समजत नाही ?
NYTimes , AUSTRALIA TODAY अश्या आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात भारताची बदनामी करण्यामागे कोणाचा हात होता हे माहित होतेच पण आता स्पष्ट झाले.
पान क्र.१ चौथा मुद्दा: "पक्षाचे समर्थन करणाऱ्या लोकांनी केवळ कुंभ मेळ्याचेच चित्र समाजात पसरवावीत जेणेकरून लोकांना कळेल कि भाजपा हिंदूंचा वापर करून घेत आहे आणि असे करताना ईद आणि इतर सणांचा उल्लेख करू नये." यात जातीयवादी राजकीय पक्ष कोण ? भाजपा कि काँग्रेस ?
पान क्र.३ : मुद्दा II : PM CARES बद्दल प्रश्न :
PM cares मध्ये वापरले गेलेल्या पैस्याबद्दल इंटरनेट वर अनेक अनेक लेख आहेत आणि त्या लेखांमधील गोष्टी सिद्ध करण्यासाठी म्हणून पुरावे देखील आहेत,
परंतु या टूलकिट मध्ये नमूद केले आहे कि निवृत्त प्रशासनकर्त्यानी मोदींना प्रश्न या बद्दल प्रश्न विचारावेत, एखादा Celebrity असेल तर त्याला या बद्दल ट्विट करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि शेवटी CONGRESS प्रशासित राज्यांमध्ये "न" वापरले गेलेल्या व्हेंटीलेटर्स ला 'DEFECTIVE ' म्हणून सरकार वर खापर फोडावं. काँग्रेस समर्थकांना हे सगळं वाचून लाज वाटली पाहिजे कि आपण कोणत्या खोट्याचे समर्थन करत आहोत.
पान क्र.३ : मुद्दा III : गुजरात.
"मोदी गुजरात चे आहेत म्हणून गुजरात ला स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहेत अश्या पद्धतीच्या बातम्या, चित्र समाजात पसरवावीत जेणेकरून लोकांना असे दाखवता येईल कि भाजपा केवळ गुजरात आणि भाजप शासित राज्यांसाठी काम करत आहे". काय पातळी गाठली आहे या पक्षाने ?
पान क्र.३ : मुद्दा IV : "दिल्ली मध्ये होणाऱ्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट बद्दल बदनामीकारक पोस्ट टाकून केंद्र कश्या पद्धतीने पैसे दुसरी कडे खर्च करत आहेत ह्यावर भर देणं. हा प्रकल्प म्हणजे मोदींच्या आत्मपूजक स्वभावाचे प्रतीक म्हणून लोकांपर्यंत पोहोचवणे."
आता या प्रकल्पाचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे तरीही निर्लाज्जासारखे स्वतःचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे लोक समाजात संभ्रम निर्माण करत आहेत.
पान क्र.४ : मुद्दा V : (D ) "ओळखीच्या हॉस्पिटल मध्ये बेड ब्लॉक करून ठेवणे जेणेकरून काँग्रेस च्या मार्फत कोणी मदत मागितली तर त्यांना ती देता येईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस कसे काम कारात आहे या बदल सांगता येईल"
आता हे काँग्रेस चेच मूर्ख आणि निर्बुद्ध समर्थक आहेत हे येनकेनप्रकारेण संघाला बदनाम करत आहेत. निरपेक्ष भावनेने, पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद सोडून संघ काम करीत आहे हे मी स्वतः पहिला आहे. पान दुर्दैवाने आपल्या समाजात असे समाजकंटक असल्यामुळे सत्य काय हे लोकांपर्यंत पोहोचत नाही.
पान क्र.४ : मुद्दा VI : मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आपल्याला एक धोका आहे तर आंतराष्ट्रीय पातळीवर असलेल्या नामवंत वृत्तपत्रांमधून भाजपच्या नाकर्तेपणाचा बातम्या आपल्या पत्रकारांना लिहायला भाग पाडा, याच्याने आंतराष्ट्रीय स्तरावर भाजपाची बदनामी होईल,
पण पुन्हा वर नमूद केल्यामुळे ह्यामुळे भारताची बदनामी होत आहे हे या मुर्खांना दिसत नाही. मुद्दामहून "अंत्यसंस्कारचे" DRAMATIC चित्र वापरावेत. खर्यार्थाने "टाळूवरचे लोणी खाणारे" हे काँग्रेसी निघाले.
पान क्र.४ : मुद्दा VI (e ) : नवीन स्ट्रेन ला 'INDIAN STRAIN " म्हणावे जेणेकरून भाजपाला बदनाम करता येईल. या काँग्रेस नालायकांना एकदाही 'WUHAN VIRUS " म्हणता आला नाही पण आज हेच लोक भारताची बदनामी करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी "INDIAN STRAIN " म्हणत आहेत !
यात काही नवीन नाही कि काँग्रेस ने कायमच देशातील अस्थिरतेचा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला आहे परंतु आज जेव्हा संपूर्ण देशच नाही तर संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा मात्र हे लोक राजकारणासाठी नीच पातळी गाठत आहेत.
काँग्रेस अनेक वेळेला अनेक ठिकाणी EXPOSE झाली आहे आता मूळ प्रश्न हा आहे कि यावर केंद्र सरकार आणि भाजपा नेते काय निर्णय घेणार ?
आम्हाला केवळ "कडी निंदा' नको आहे तर यावर लवकरात लवकर ACTION हवी आहे.
No comments:
Post a Comment