केरळ आणि परिवर्तन | Kerala Story

  केरळ आणि परिवर्तन !



' असोल पोरीबोर्तन ' हे वाक्य सध्या ट्विटर, फेसबुक आणि न्यूज चॅनेल वर गाजत आहे. बंगाल मध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन होणं गरजेचं आहे पण त्याहून महत्वाचे राज्य मला वाटतं जिथे परिवर्तनाची गरज आहे ते म्हणजे ' केरळ ' आणि याची कारणं मी इथे नमूद करतो. 

केरळ मध्ये आत्ता ६०% हिंदू आहेत, तर १८% ख्रिश्चन, १६ % मुसलमान आणि बाकीचे ६%. एकेकाळी हिंदू बहुसंख्य असलेले राज्य हळू हळू करत हिंदू अल्पसंख्य होत चाललं आहे हे दिसत आहे आणि याचे कारण म्हणजे इथले बदललेले लोकसंख्याशास्त्र अर्थात DEMOGRAPHY.

टिपू सुलतान च्या काळात या भागाचे लोकसंख्याशास्त्र हिंदूंच्या विरोधात बदलले. जे म्हणून इस्लाम स्वीकारत नसे त्यांना तो मारत असे, मग ते हिंदू असो किंवा ख्रिश्चन आणि याला इतिहास साक्ष आहे. या सगळ्यात हळू हळू करत इस्लामिक धर्मांधांचे आणि ख्रिश्चन मिशनरीज चे बळ या भागांमध्ये वाढत गेले.

१९५६ ला केरळ या राज्याची स्थापना झाली आणि स्थापनेपासून इथे कायमस्वरूपी कम्युनिस्ट विचारधारेच्या आणि इस्लामिक विचारधारेच्या पक्षांचे सरकार राहिले आहे. या संपूर्ण कालखंडात हिंदूंच्या बाजूने मत मांडणाऱ्या लोकांचे किती बळी गेले आहेत हे आपण पहिलेच आहे.

रास्व संघाचे अनेक कार्यकर्ते, भाजपा चे अनेक कार्यकर्ते अनेक वेळेला राजकीय हत्येचे बळी पडले आहेत. कम्युनिस्ट पार्टीचा रक्तरंजित इतिहास सर्वश्रुत आहे. राजकीय विरोधकांना मारणे आणि गरीब, दीनदुबळे, दलित या सगळ्यांच्या रक्षणाचा आव आणणे हे त्यांच्या रक्तातच आहे.

कुम्मणम राजशेखरन, यांनी नमूद केले आहे कि LDF आणि युती मध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी , RSS  आणि BJP  च्या २५६ कार्यकर्त्यांना मारले आहे. पोलिटिकल किलिंग्ज हे ज्या ज्या ठिकाणी म्हणून कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात असतो त्या त्या ठिकाणी घडत आहेत ते इतिहास सांगतोच.

या पुढे जाऊन संपूर्ण देशातून सगळ्यात जास्त ISIS मध्ये जाणारा तरुण वर्ग हा केरळ मधला आहे. देशातील सगळ्यात सुशिक्षित असलेला प्रदेशमधून एवढे लोक ISIS मध्ये जातातच कसे ? आणि हीच जर तुमची LITERACY ची परिभाषा असेल तर मग दुर्दैव आहे. 

२०१२ ते २०१७ मध्ये NIA च्या एका रिपोर्ट प्रमाणे १७७ तरुण तरुणी ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून सीरिया किंवा इतर इस्लामिक राष्ट्रात जाऊन पुन्हा भारतात इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी आले.

या चौकशी मध्ये पकडल्या गेलेल्या एकाने सरळ सरळ नमूद केले कि त्याचा उद्देश ' जिहाद ' करणे आहे आणि इथे ' दारुल- इस्लाम ' स्थापना करणे आहे. यावर राज्यसरकारने काय पाऊल उचलले ? काहीही नाही !

आणि आपण कोणीही हे विसरू नये कि खिलाफत चळवळी मध्ये ज्या तीन गावांच्या हिंदूंना मारले गेले ती तीन गावे आजही इस्लामिक धर्मांधतेचा विळख्यात जखडली गेली आहेत .  गावांचे नावे एर्नाड, वाळूवनाड आणि पोन्नानी.

लव्ह जिहाद थोथांड आहे म्हणणारे PFI ( पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ) या इस्लामिक संस्थेच्या वक्तव्यावर विश्वास  का ठेवत नाहीत हे माहित नाही.

सत्या सारीनी ( PFI च्या अंतर्गत असलेली एक संस्था ) च्या अध्यक्ष असलेल्या झैनाब हिने मान्य केले कि त्यांचा उद्देश ' अनेकांना खासकरून मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हा आहे ". हे इंडिया टुडे च्या २०१८ च्या रिपोर्ट मध्ये नमूद आहे. 

https://t.co/5C7w9tbpPj


सत्या सारीनी ( PFI च्या अंतर्गत असलेली एक संस्था ) च्या अध्यक्ष असलेल्या झैनाब हिने मान्य केले कि त्यांचा उद्देश ' अनेकांना खासकरून मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे हा आहे ". हे इंडिया टुडे च्या २०१८ च्या रिपोर्ट मध्ये नमूद आहे. म्हणजे नकळत पणे काँग्रेस जी स्वतःला धर्मनिरपेक्ष पार्टी दाखवते ती सुद्धा या सगळ्यात सहभागी आहे.  केरळ मध्ये सापडले जाणारे तरुण जे दहशतवादी संघटनांशी थेट जोडले गेले आहेत, नंतर अशी घडणारी धर्मांतरे, हिंदूंची कमी होणारी लोकसंख्या, हिंदूंच्या त्यांच्या धर्मस्थळांवरती नसलेला अधिकार आणि HIGHEST LITERACY RATE या नावाखाली अनेक वर्ष केली गेलेली फसवणूक या सगळ्या गोष्टींकडे पाहता, इथे खर्यार्थाने परिवर्तनाची गरज आहे असं मला वाटतं. कम्युनिस्ट पक्ष असो...

किंवा जिहादी विचारांनी प्रेरित असलेले पक्ष एकाच माळेचे मणी आणि आपल्याला अजून एक मोठा धोका म्हणजे ' CHRISTIAN CONVERSIONS ' जी दक्षिण भारतात खासकरून तामिळनाडू आणि केरळ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर  चालू आहेत, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.

आशा करूया कि येत्या काही दिवसात ' GODS OWN COUNTRY ' मध्ये परिवर्तन घडेल.


Post a Comment

أحدث أقدم