" सुभेदाराची सून साडीचोळीनिषी पाठवणाऱ्या, रांझेच्या पाटलाचा चौरंग करणाऱ्या महाराष्ट्राला की,
महिलांना हरामखोर म्हणून, बेकायदा त्यांची घर तोडून व बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मोगलाईला ?"
तलवारीच्या पातीवर स्वाभिमानच स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राला की,
जनतेच्या आशीर्वादाला भोकसून, लुबाडून, फसवूण सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसेलेल्या ठाकरशाहीच्या मोगलाईला ?
शेतकऱ्यांच्या गवताच्याही पातीला धक्का न लावणाऱ्या महाराष्ट्राला की,
शेतकऱ्यांची कचाकचा वीज तोडून वसूली करणाऱ्या, खंडणीखोर वीजतोड व चमडीचोर मोगलाईला?
साधूसंत, लेकीबाळी, व्यापारी, व पोरांच्या गुण्यागोविंदात नांदणाऱ्या महाराष्ट्राला की
सांधूसंतांच्या दगड काठ्यानी ठेचून हत्या होणाऱ्या, येणाऱ्या पिढ्यांच्या ताटात अस्थिरता व अराजकतेच विष कालवणाऱ्या मोगलाईला?
आमचा प्रणाम छत्रपतींच्या साधूसंतांच्या महाराष्ट्राला
आमचा प्रणाम अटकेपार भगवा फडकवणाऱ्या, मराठ्यांच्या पेशव्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला
पण आमचा प्रणाम पवार ठाकरे घराण्यांच्या गुलामी हुजरेगिरी करणाऱ्या मोगलाईला कधीच नाही.
महाराष्ट्र हा छत्रपतींच्या विचारांचा पाईक
पवार ठाकरेंना मुजरे घालन आमच्या रक्तात बसत नाही.
वीजतोड खंडणीखोर व चमडीचोरांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही
जनतेच राज्य आल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही
"दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
जयजय महाराष्ट्र माझा"🚩
#महाराष्ट्रदिन
#महाराष्ट्र_दिन
#गर्जामहाराष्ट्रमाझा
إرسال تعليق