केंद्र सरकार काय करत आहे.......

 

केंद्र सरकार काय करत आहे.......


🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन जनरेशन प्लँटस विमानाने आणले


🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले


🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले


🟣 UK चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन


कॉनसेंट्रेटर मशीन भारताला पाठवून देत आहोत अस सांगितलंय..


🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..


🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..

🟣 

केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे


🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय नौसेनेच्या माध्यमातून पोहोचवले आहे..


🟣 लेह आणि लडाख सारख्या अतिदुर्गम भागात चिनुक हेलिकॉप्टर आणि 32 सीटर विमानातून कोविड नियंत्रणासाठी लागणारे सर्व सामान पोहोचवले जात आहे


🟣 केंद्र प्रत्येक राज्यात डेडिकेटेड मेडिकल ऑक्सिजन प्लँटची उभारणी युद्ध पातळीवर करत आहे

🟣 

केंद्राने टाटा,अंबानी, अदानी, जिंदाल या सर्व उद्योगपतींसोबत त्यांच्या औद्योगिक प्लँट मधून आवश्यकता आहे तिथे ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी समन्व्य साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशातील सर्व ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांसोबत वैयक्तिक फॉलो अप घेत आहेत..

🟣 केंद्राने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 1000 पेक्षा जास्त ऑक्सिजन आणि ICU बेड उभारले आहेत


🟣 केंद्राने रिमेडिसिवीर उत्पादक कंपन्यांना योग्य ते निर्देश देऊन तसेच नवीन 25 उत्पादन फर्मला मान्यता देऊन आपले रिमेडिसिवीरचे उत्पादन 40 लाख व्हायल्स प्रती महिना ते 90 लाख व्हायल्स प्रती महिना करायला भाग पाडले आहे


🟣 PMCares निधी च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात Oxygen प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला गेलाय. 


🟣 संरक्षण खात्या अंतर्गत असणाऱ्या DRDO, AFMS (Armed Forces Medical Services) यांच्या द्वारे बेड, डॉक्टर उपलब्ध करून आपल्या परीने शक्य तेवढ सहकार्य करत आहेत.. 


परवाच केंद्रीय रक्षा मंत्रालयाने AFMS ला आपत्कालीन खर्चाला स्वतंत्रपणे मंजुरी दिलेली आहे.. AFMS चे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, पॅरामेडिकल डॉक्टर, नर्स हे दिल्लीतील छत्तरपुर भागातील सरदार वल्लभभाई कोविड सेंटर मध्ये परवाच दाखल झालेले आहेत.. 


🟣 औद्योगिक कंपन्याना त्यांच्या CSR फ़ंडातून आरोग्य सुविधा निर्माण करायला केंद्राने मोकळीक दिलेली आहे


🟣 केंद्रीय रेल्वेने आजपर्यंत आपल्या रेल्वे कोचचे रूपांतर कोविड केअर कोचेस मध्ये केलेले आहे.. आज दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी असे 3916 कोविड केअर कोचेस तयार असून त्यात जवळपास 


64,000 बेड उपलब्ध आहेत.. हे रेल्वे कोचेस विविध स्थानकावर तयार ठेवले असून आवश्यकते नुसार विना विलंब वापरात यावेत अशी सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे


🟣 देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटी रुपये तर भारत बायोटेकला

1500 कोटी रुपये मदत... 


🟣 केंद्राने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोविड लसीकरण खुलं करून दिलेलं आहे


🟣 केंद्राने पुढील 2 महिने देशातील जवळपास 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्याची जबाबदारी घेतलेली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post